कादंबरी लिहिता आली तरी त्याची अर्पणपत्रिका लिहिता येईलच असे नाही किंवा लिहिली तरी ती तितकिशि समर्पक असेलच असे नाही. सुशिंचा मात्र याबाबतीत हात धरणारा कोणी नाही. त्यांची अर्पण पत्रिकेची खास स्टाईल होती. इतकचं काय, सुरेश वैद्यांसारख्या लेखकांच्या पुस्तकांसाठी त्यांनी अर्पण पत्रिका लिहिल्या.
आपण पाहुयात सुशिंच्या अशाच काही खास अर्पणपत्रिका.
दुनियादारी १ ली आवृत्ती .-दिग्या, श्रेयस, नितीन, अश्क्या, साईनाथ, प्रीतम, शिरीन, मिनू, राणी मां आणि एम्.के.’दुनियादारी’तली ही पात्र ज्यांच्यामुळं निर्माण झाली,त्या ’कट्टा गँग’ला- -सुहास शिरवळकर
दुनियादारी २ री आवृत्ती -’दुनियादारी’ची ही द्वितीयावृत्ती त्या वाचकांना-ज्यांनी अक्षरश: कादंबरीची वीस-वीस पारायणं करुन, माझ्यावर पत्रांचा वर्षाव करुन, तिला दुसऱ्या आवृत्तीचं भाग्य मिळवून दिलं! -सुहास शिरवळकर
दुनियादारी ३ री आवृत्ती - त्या सर्व वाचकांना, ज्यांनी 'दुनियादारी' विकत घेतली; वाचनालयातून वाचली; मित्राची ढापली; वाचनालयाची पळवली...पण 'दुनियादारी' वर मनापासून प्रेमच केलं ! त्यांनाही, ज्यांनी 'दुनियादारी'च्या लोकप्रियतेचा मनापासून द्वेष केला ! आणि....खेडं, गाव, शहर, नगर, व महानगरातील तमाम 'कट्टा-गँग्ज'ना, ज्या 'दुनियादारी' जगल्या....जगतात ....जगतील ! - सुहास शिरवळकर
कोवळीक २ री आवृत्ती - चार वर्षांच्या अल्पावधीत ज्यांनी सहस्र करांनी अनुभवाचं विश्व उधळलं-त्या, बी.एम्.सी.सी. मधल्या समृद्ध क्षणांना!- रोल नं, वन-फोर-सेव्हन, टी.वाय्. 'बी' -सुहास शिरवळकर
प्रतिकार 3 आवृत्ती - मुझे इंतजार है - बलात्काराच्या बातम्या होणार नाहीत...चर्चा होणार नाहीत...अशा दुर्देवी तरुणीकडे वाईट,संशयी नजरेनं पाहिलं जाणार नाही...स्त्रीच्या असहायतेचा गैरफायदा घेतला जाणार नाही...शरमेनं समाज मान खाली घालेल...आणि, एक तरी तरुण स्वीकारासाठी हात पुढे करेल...कलम नंबर शंभरचा खरा अर्थ मना-मनातून रुजेल; त्याचे उद्घोष होतील...- वो सुबह कभी तो आएगी! -सुहास शिरवळकर
समथिंग- ही कादंबरी मी तुला अर्पण केलीये हे लक्षात येतंय, का आपलं....नाहीच ? - सुहास शिरवळकर
आँब्जेक्शन युवर आँनर - सुप्रसिद्ध आंग्ल लेखक श्री अर्ल स्टँनले गार्डनर ह्यांना - ज्यांच्या मानसपुत्रामुळे अमर विश्वास हे पात्र निर्माण झालं - सुहास शिरवळकर
काळंबेरं – माथेरान मधील तीन पावसाळी दिवस-रात्रींना..... - सुहास शिरवळकर
मधुचंद्र'- विश्वामित्र पाहत असताना 'मेनके' च्या ज्या प्रथम दर्शनाने मला ही कल्पना सुचली, त्या दर्शनाला-अर्थात, 'भानुप्रिया' ला ही, नित्या क्षणी माझ्यासकट सर्वांचाच 'विश्वामित्र' करणाऱ्या सर्व यशस्वी कला-तंत्रज्ञांनाही ! - सुहास शिरवळकर
हमखास - श्री. शशिकांत अ. ठाकूर सर...मुख्याध्यापक म्हणून 'हिरालाल सराफ' प्रशालेतून निवृत्त होण्यापूर्वी, ज्यांना 'आदर्श शिक्षक' पुरस्कार मिळणं, शिक्षण-खात्याला भूषणावह ठरलं असतं; आणि, तो न मिळताही, ते 'आदर्श शिक्षक' च राहिले ! त्यांच्या कळकळीला...सेवाव्रताला...आदरपूर्वक अर्पण.- माजी विद्यार्थी, 'शिऱ्या' - सुहास शिरवळकर
ह्रुदयस्पर्श- मीत...तुला-म्हणजे, तुला-म्हणजे, तुलाच का माहितीये ..? - सुहास शिरवळकर
क्षणोक्षणी - प्रत्येक कादंबरीत काही तरी आशय असलाच पाहिजे-असं न मानणाऱ्या गोष्टी-वेल्हाळ वाचकाला- -सुहास शिरवळकर
काटेरी - त्या समस्तांना , जे पंगूत्वाचा भांडवल न करता, स्वयंपूर्ण जगण्याचा प्रयत्न करतात, आणि जे मानसिक अपंग नाहीत ! - सुहास शिरवळकर
झूम - खानदानी मदयाचा आस्वाद घेत, त्याचा आकंठ उपभोग घेण, आणि...
खानदानी धुळीस मिळवत मद्याने आपल्याला वापरणं ...
हृदयस्पर्श -
- दास्तान -
यूं तो हर लम्हा इक बहाना है
दिल के रोने को, ऐ दोस्त !
रंज है तो सिर्फ इस बात का
के हर कोई अपनी ही
किसी बात पे रोता है !
जब किसी गैर की खातिर
छलकती है आंखे –
वहीं से एक दर्दभरी
दास्तां शुरू होती है
- सुहास शिरवळकर
यूं तो हर लम्हा इक बहाना है
दिल के रोने को, ऐ दोस्त !
रंज है तो सिर्फ इस बात का
के हर कोई अपनी ही
किसी बात पे रोता है !
जब किसी गैर की खातिर
छलकती है आंखे –
वहीं से एक दर्दभरी
दास्तां शुरू होती है
- सुहास शिरवळकर
क्षितिज – टिपकागदी शोषण-गुणधर्माने सारे अनुभव पचवून, जिलेटिनच्या प्रक्षेपण- गुणधर्माने योग्य वेळी, योग्य अनुभव रसिकांपर्यंत पोहचावणाऱ्या सर्व कलावंतांना - सुहास शिरवळकर
जाता येता – श्रावण ऐन बहरात असताना लोणावळा / खंडाळ्यास छत्री / रेनकोट न नेता सहल काढण्याचा उत्साह असणाऱ्या तरुण – तरुणींना - सुहास शिरवळकर
चूक –भूल...देणे;घेणे ! -
संधी,
एकदा निश्चित तुमचं दार ठोठावते.
दुसऱ्या वेळी ती आल्याचा भास होतो.
तिसऱ्यांदा.ती यावी, असं वाटतं.
चौथ्या वेळी,आपण भासच खरा मानतों.
आणि, पाचव्या वेळीही. ती खरंच आली,
तर…आपण पहिल्या वेळेसारखचबेसावध असतो !
एकदा निश्चित तुमचं दार ठोठावते.
दुसऱ्या वेळी ती आल्याचा भास होतो.
तिसऱ्यांदा.ती यावी, असं वाटतं.
चौथ्या वेळी,आपण भासच खरा मानतों.
आणि, पाचव्या वेळीही. ती खरंच आली,
तर…आपण पहिल्या वेळेसारखचबेसावध असतो !
- सुहास शिरवळकर
काटेरी - त्या समस्तांना , जे पंगूत्वाचा भांडवल न करता, स्वयंपूर्ण जगण्याचा प्रयत्न करतात, आणि जे मानसिक अपंग नाहीत ! - सुहास शिरवळकर
झूम - खानदानी मदयाचा आस्वाद घेत, त्याचा आकंठ उपभोग घेण, आणि...
खानदानी धुळीस मिळवत मद्याने आपल्याला वापरणं ...
यातली पुसट सीमा-रेषा ओळखून , वेळीच थांबू शकत असशील, तर तुलाच... ! - सु.शि.
हृदयस्पर्श -
श्वासाचे अंतर
जन्म आणि मृत्यूत
येताच रडे जो,
जातो तो रड़वीत.
या रडण्यामधले दान
असे आयुष्य,
आयुष्यच व्हावे –
सुरेल.... सुंदर गीत !
- सुहास शिरवळकर
वास्तविक –
आयुष्यातून एक –एक माणूस
गळत जाणं, किंवा
एक – एक माणसाणं आपल्याला
वज़ा करत जाणं…
शेवटी, स्वत:साठीची एक
शून्य पोकळी, अन त्या पोकळीत
स्वतःचाच शोध घेत
पोकळीच्या अस्थिरतेन
अखेरच्या श्वासापर्यंत
भिरभिरत राहाणं ...
म्हणजेच अंतिम वास्तव असेल का ?
एक – एक माणसाणं आपल्याला
वज़ा करत जाणं…
शेवटी, स्वत:साठीची एक
शून्य पोकळी, अन त्या पोकळीत
स्वतःचाच शोध घेत
पोकळीच्या अस्थिरतेन
अखेरच्या श्वासापर्यंत
भिरभिरत राहाणं ...
म्हणजेच अंतिम वास्तव असेल का ?
- सुहास शिरवळकर
निदान - योग्य वेळी ‘एक्झीट’ घेवून, आपल्या नसलेल्या अस्तित्वानेच हुरहुर लावू शकण्याची कला साधलेल्या माणसांना ... - सुहास शिरवळकर
वेशिपलीकडे - नवीन पिढीतील त्या युवकांना - करमणुकीची अन्य माध्यमं ज्यांना फार काळ भुलवू शकत नाहीत ! - सु.शि.
बंदिस्त - स्वातंत्र्य आणि स्वैराचार यातील फरक ओळखून , मगच माणूस म्हणून मुक्त जीवन जगणाऱ्या विचारी स्रियांना ... - सु.शि.
कल्पांत - सुनील दत्त के नाम , यह शख्स अभिनेता है, नेता है, और इसके बावजूद एक सच्चा इन्सान भी ! - सु.शि.
बरसात चांदण्यांची - अभ्यास वगैरे सर्व सांभाळून "लफडं" अफेअर मध्ये बदलण्यात यशस्वी होणाऱ्या महाविद्यालयीन युवकांना ..... - सुहास शिरवळकर
कोवळीक -
काकाचं कॅन्टीन ...
त्या बाहेरचा बोधि-वृक्ष ...
मागची टेकडी ...
होस्टेल्स ...
ग्राउंडचा ओटा...
'वर्ग' सोडून बी. एम.सी .सी. तल्या सर्व पवित्र स्थळांना,जिथे मी अज्ञानाचा सज्ञान झालो !
- सु.शि.त्या बाहेरचा बोधि-वृक्ष ...
मागची टेकडी ...
होस्टेल्स ...
ग्राउंडचा ओटा...
'वर्ग' सोडून बी. एम.सी .सी. तल्या सर्व पवित्र स्थळांना,जिथे मी अज्ञानाचा सज्ञान झालो !
मधुचंद्र -
नूरजहां, सुरैया, वहिदा,
वैजयंतीमाला, मधुबाला, नूतन ...
ते, माधुरी, श्रीदेवी, रेखा ...
ते, ऐश्वर्या, राणी मुखर्जी,प्रीती झिंटा, करिष्मा, काजोल ...- दर बदलत्या पिढीनुसारपैकी कोणा ना कोणा अभिनेत्रीलाहृदय - सिंहासनावर स्थापित करूनही,वास्तवाचे भान ठेवून,तितक्याच उत्कट प्रेमानेआपापले संसार सांभाळणाऱ्या
दर तरुण पिढीतील असंख्य तरुणांना !
- सुहास शिरवळकर
ऑब्जेक्शन युवर ऑनर – 'अमर' कथांपासून स्फूर्ती घेऊन यशस्वी झालेल्या अनेक तरुण वकिलांना -
- सुहास शिरवळकर
सॉरी सर - 'वाँटेड' प्रेमी बेकार तरुणांना - सुहास शिरवळकर
तलखी - त्या सर्व कलाकारांना ज्यांना, आपण कोठे आहोत याची जाणीव असते आणि, आपली कला दुय्यम न मानता जे तिच्यावर मनापासून प्रेम करतात ! - सुहास शिरवळकर
थोडक्यात असं -
प्रकाशन व्यवसायातील प्रवृतींना
- ज्यांनी मला दिवाळीचे दिवस दाखवले,आणि अमावास्येच्या काळ्याकुट्ट रात्रीही !
- सुहास शिरवळकर
- ज्यांनी मला दिवाळीचे दिवस दाखवले,आणि अमावास्येच्या काळ्याकुट्ट रात्रीही !
- सुहास शिरवळकर
झालं गेलं - श्री. कुमठा शेठ, बॉम्बे बुक डेपो यांना - वितरण क्षेत्रातील त्यांच्या निरपेक्ष, सज्जन आणि प्रदीर्घ सेवाभावी कारकिर्दीबद्दल आदरपूर्वक ! - सुहास शिरवळकर
सावधान - वाटेल ते धोके पत्करून, प्रेम - विवाह करणाऱ्या व हे विवाह यशस्वीपणे जगणाऱ्या जोडप्यांना
पळभर, जन... ! -उतप्ती, स्थिती व लय हि त्रिसुर्ती निर्विकारपणे स्विकारणाऱ्या सर्व सामान्य महामानवांना
निमित्तमात्र - असंख्य निमित्तमात्रांना ज्यांना परिस्थितीचं सर्वंकषत्व अनुभवाने पटलं आहे !
निमित्तमात्र - असंख्य निमित्तमात्रांना ज्यांना परिस्थितीचं सर्वंकषत्व अनुभवाने पटलं आहे !
अंमल - 'स्मॅस' ग्रुप, कल्याण - तुमच्या सुशि प्रेमाला !
गढूळ - प्रिय मित्र श्री. यशवंत रांजणकर ह्यांना
No comments:
Post a Comment