Suhas Shirvalkar

Suhas Shirvalkar

सु.शिं.च्या कविता


यूँ तो हर लम्हात एक बहाना है
दिल के रोने को ए दोस्त
मगर रंज है तो सिर्फ़ इस बात का के
हर कोई अपनी ही किसी बात पे रोता है
जब किसी गैर की खातीर छलकती है आंखे
वही से एक दर्दभरी दास्ताँ शुरू होती है
………………………………………………………………

आत्ताच कशास्तव
सामोरा आलास
नुकताच कुठे मी
नीट घेतला श्र्वास
दर आठवणींनी
छिन्न-छिन्न होताना
होतास तू, अन
तुझाच होत भास!
………………………………………………………………


कधी एकदा
माझ्यासाठी...
पोर्णिमेचा शीतल चंद्रमा
नक्षत्रभरल्या रात्री
चांदण्यांची बरसात
उगवतीचा रक्तिमा
मावळतीचे क्षितीज रंग
नि,
सारंच काही
तिष्ठत होतं
मी साला
माझ्यात नशेत!
अन आता
मी तिष्ठत आहे,
सीमा-रेषांवर-
ती स्वप्न-पाखरं
पुन्हा भेटावीत
म्हणून!
……………………………………………………………

'असीम-जीवन पथ चालताना-
तुझे पाय थकणार नाहीत का?
माझा सगळा आनंद...उत्साह घे;
मला तुझ्या साऱ्या जखमा...दु:ख दे.
---मी तर तुझी सावलीच आहे रे,
चालण्याची शक्ती तुलाच हवी आहे!'
………………………………………………………………

शब्दांत सारं काही
सांगायचं नसतं,
तरीही, सारं काही
'सारं काही' असतं!
तुला काय वाटतं-?
नि:शब्दालाही
अर्थांचे घुमारे फुटावेत...
निरर्थकही सार्थ व्हावं...
असं
शब्दांपलीकडलं
काही असतं, का
काहीच तसं नसतं?
………………………………………………………………

एक कविता तुझ्यासाठी
लिहिन,कधी म्हटलं होतं.
एक गीत तुझ्यासाठी गाईन,
कधी म्हटलं होतं!
हजारो कविता लिहिल्या...
शेकडों गीतं गायिली...
तेव्हा नाही;
तेव्हा नाही, आणि
आताच का ती आठवण
मनातली कविता मालवल्यावर...
भैरवीचेही सूर विरल्यावर...
………………………………………………………………

'ती कळि परवाची,फूल कालचे झाले!
गर्वाने वार्‍यावरति डुलू लागले-
क्षिति नाही उद्याची,तमाहि नाही फार;
निर्माल्य आज ते-
निर्माल्य आज ते,उडले वार्‍यावर!'
………………………………………………………………

'आज तुझ्या आठवणीत
आयुष्यातला
एक-एक क्षण...
मी विसरत आहे!
विसरते क्षण...
पसरत्या आठवणी...
सारं काही
'तुझंच आहे!...तुझंच आहे!
………………………………………………………………


'रंगवुनि स्वप्न माझे-
निघुनी का गेलास तू?
जीवनाचा अर्थ मजला
सांगुनि गेलास तू!
जीवनाचे चित्र माझ्या
आज मी रे रेखिले!
रंग त्याचा होऊनी अन्‌
उडूनि का गेलास तू?
मूर्ति तव मी नयनि माझ्या
होती रे रेखाटली-
अश्रुधारा होऊनी अन्‌
निघुनी का गेलास तू?
चित्र अपुरे...स्वप्न अधुरे
सांग रे फुलवू कशी
मीलनाची आस मज का-
लावूनि गेलास तू?'
………………………………………………………………

2 comments: